नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आरोग्य विभागामध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की जिल्हा परिषद विभागामध्ये आरोग्य विभागाची जाहिरात निघालेली आहे . यामध्ये राष्ट्रीय आयुष्य अभियानांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर तथा आयुर्वेद दवाखान्या मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबद्दल जाहिरात आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांना अर्धवेळ योग्य प्रशिक्षक मानधन तत्वावर निवड करण्यात येणार आहे . नोकरीचे ठिकाण तुम्हाला पंढरपूर जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहे.
या भरती बद्दल पात्रता काय आहे?
विद्यापीठाची योग्य विषयाची पदवी, किंवा पदविका किंवा QCI /YCB Leval 1,2,3 किंवा नामांकित योग्य संस्थेकडून सर्टिफाईड असावा.
विद्यार्थ्यांचे वय 21 वर्षे पूर्ण असावे आणि पुढे कितीही वर्ष चालेल. (संबंधित सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी)
इतर महत्त्वाच्या माहिती
- कृपया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी ही सेवा निवळ मानधन तत्वावरील आहे, ही नियुक्ती अर्धवेळ असल्यामुळे विद्यार्थ्यांनी इथे अर्धवेळ काम करून कुठेही आपले दुसरे काम पण करू शकतात.
- या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या आरोग्य विभागात ठिकाणी जाऊन मुलाखती देणे बंधनकारक राहील. आणि मुलाखतीचे ठिकाण हे तुम्हाला सोलापूर जिल्हा असणार आहे.
- या भरती बद्दल तुम्हाला इमेल द्वारे अर्ज पाठवायचे आहे त्याकरिता त्याची लास्ट तारीख 7 मार्च 2025 पर्यंत राहणार आहे .
- विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करावा आणि अर्ज या ईमेलवर पाठवावा ईमेल आयडी पुढील प्रमाणे- ayushsolapur2023@gmail.Com
- अर्जासोबत काही महत्त्वाची डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे त्यामुळे जाहिरातीमध्ये त्या डॉक्युमेंट ची लिस्ट दिलेली आहे ती जाहिरात डाऊनलोड करून वाचावे.
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा .
0 Comments